महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : महाराष्ट्र गौरव, मधुर गायक प.पू. गौतममुनीजी म.सा., युवा प्रेरक प.पू. चेतनमुनीजी म.सा. यांच्या चातुर्मासाला महावीर प्रतिष्ठान मध्ये हर्ष उल्हासात प्रारंभ झाला.
गेल्या वर्षी संतांचा सुरत (गुजरात) चार्तुमासात, श्रावक संघ साधना सदन, पूना संघाच्या वतीने २०२४ च्या चार्तुमासची विनंती केली व त्यांचे गुरु श्री प. पू. प्रवर्तक आशिषमुनीजी म. सा. एवं सर्व मोठ्या गुरूंनी, चार्तुमास पुण्यात करण्यास स्विकृती दिली.
त्या प्रमाणे २०२३ चा चार्तुमास पुर्ण करून ते सुरत येथुन पायी प्रवास करत मुंबई, पनवेल, लोणावळा, कासारवाडी या क्षेत्रांमध्ये विचरण करत मे महिण्याच्या अखेरीस पुण्यात त्यांचे आगमन झाले. पुण्याच्या अनेक संघांनी त्यांच्या प्रवचनाचा व सानिध्याचा लाभ घेतला.
श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ साधना सदन, येथे १४ जुलै रोजी मोठ्या उत्साहात चातुर्मास प्रवेश महावीर प्रतिष्ठान येथे संपन्न झाला. त्या वेळी महावीर स्कूल मधील विद्यार्थी व शिक्षक, शेकडो भक्तगण हे त्यांच्या स्वागतास उपस्थित होते. पुण्यातील अनेक आमदार, नगरसेवक व सर्व पक्षांचे पदाधिकारी स्वागतास उपस्थित होते.
पुणे सकल संघाचे पदाधिकारी व अनेक भक्त सुरत, चांदवड, धुळे, मुंबई अशा अनेक शहरांमधून उपस्थित होते. २० जूलै रोजी चार्तुमासाच्या प्रथम दिवसाची सुरूवात तप जप एवं शेकडोंच्या उपस्थितीत झाली.
प. पू. गौतममुनीजी म. सा. व सेवाभावी प. पू. चेतनमुनजी म. सा. यांचा चातुर्मास चार माह चार्तुमासचे महत्व या प्रवचनाने सुरूवात झाली. त्याच प्रमाणे उपस्थित बांधवांना उपदेश दिला की, या चार्तुमास काळात सर्वांनी जास्तीत जास्त धार्मिक क्लासेस, प्रश्नमंच, बालशिबीर, स्वाध्याय याचा लाभ घ्यावा.
सर्व तपस्या करणाऱ्यांसाठी संघाकडून व्यवस्था केली जाणार आहे. हा चार्तुमास यशस्वी व्हावा म्हणून साधना सदन श्री संघाची संपुर्ण कार्यकारीणी सभासद व महिला मंडळ, युवा मंडळ यांनी परीश्रम घेतले.
तसेच आज रोजी संस्थेचे अध्यक्ष विजयकांत कोठारी, रायचंद कुंकुलोळ, विजय भंडारी, वालचंद संचेती, राजश्री पारख, लखिचंद खिंवसरा, विजय धोका, अरूण शिंगवी, नितीन ओसवाल, पन्नालाल लुणावत, देवेंद्र मुथा, शशिकांत सुराणा, संजय ओसवाल, सुनिल मुथा, विजय भटेवरा, सज्जनबाई बोथरा, चंचल कोठारी आदि कार्यकारीणी, सदस्य व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. अशी माहीती साधना सदन संघाचे महामंत्री आदेश खिंवसरा यांनी दिली.
