कोंढवा पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढवा परिसरातून रिक्षा चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली. फोनवर बोलत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांची रिक्षा चोरी करून नेली. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१२ जुलै २०२४ रोजी फिर्यादी यांनी त्यांची ८०,०००/- रू कि ची बजाज कंपनीची रिक्षा ही प्रमिला अपार्टमेंटच्या बाहेर, सिग्नेचर हॉटेल शेजारी, लुल्लानगर चौक जवळ, कोंढवा खुर्द पुणे येथील रोडलगत पार्ककरून ठेवली होती.
सदरचा गुन्हा घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू केला.
दि. २० जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे हे स्टाफ सह गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना येवलेवाडी, कामठे पाटीलनगर येथे आले असता एक इसम सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली बजाज कंपनीची काळ्या व पिवळ्या रंगाची रिक्षा चालवित असताना दिसून आला.
सदर इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव संदिप बबन गोसावी, (वय ३५ वर्षे, रा. जिल्हा परिषद शाळे समोर, येवलेवाडी, कोंढवा बु., पुणे मुळ रा. रूमनंवर ५६, श्री कृपा सोसायटी, गुरूदत्त मंडळ, पार्क साईड, विक्रोळी पश्चिम, मुंबई) असे असल्याचे सांगितले.
त्याच्याकडे असलेल्या रिक्षाबाबत अधिक तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे मान्य केल्याने त्यास दाखल गुन्ह्यामध्ये अटक करून त्याचे ताब्यातून एक काळ्या व पिवळ्या रंगाची रिक्षा ही जप्त करण्यात आलेली आहे.
सदरील कारवाई ही पोलीस उप-आयुक्त आर. राजा, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, व रूणाल मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, लक्ष्मण होळकर, शाहिद शेख, सुजित मदन, सुरज शुक्ला, सागर भोसले व अनिल बनकर यांनी केली आहे.















