डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : डेक्कन परिसरातील श्री संत तुकाराम महाराज पादुका मंदिरातील दानपेटीची त्यातील रकमेसह चोरी झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डेक्कन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोणीतरी अज्ञात इसमाने कडी तोडून २८ जुलै रोजी फर्ग्युसन कॉलेज रोड, वरील मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील दानपेटी व त्यात असलेली रोख रक्कम ८,०००/- रुपये चोरी करून घेऊन गेले आहेत. सकाळी ही घटना उघडकीस आली, त्यानंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. हा तपास पोलीस अंमलदार दशरथ गभाले करीत आहेत.
