भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रज नजीक दोघांना अंमली पदार्थ विकताना पकडले.त्यांच्याकडून २२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या कडुन २१,३८,२००/- रू. कि. चे १०६ ग्रॅम ९१ मि. ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त कऱण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड व अंमलदार हे भारती विदयापीठ पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक २९ जुलै रोजी पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कात्रज तलाव येथे दोन इसम एम. डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्री करता येणार आहेत.
सदर बातमीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथक २ कडील पोलीस निरीक्षक, पंडीत रेजितवाड, पोलीस उप-निरीक्षक, रामकृष्ण दळवी, दिगंबर चव्हाण व अंमलदार यांनी कात्रज परीसरात सापळा लावला असता कात्रज तलाव गेट नं.१ समोर, सार्वजनिक ठिकाणी इसम श्रवणसिंग बलवंतसिंग राजपुत, (वय-२२ वर्षे, रा. तुळजाभवानी नगर, खराडी पुणे, मुळ रा- नयानगर ता-बुडा मलानी जि-बाडमेर, राज्य राजस्थान, व महेश पुनाराम विश्नोई (वय-२० वर्षे, रा-तुळजाभवानी नगर, खराडी पुणे, मुळ गाव कुशलावा ता-फालोदी जि-जोधपुर, राज्य-राजस्थान) हे त्यांची मोपेड घेवुन थांबलेले दिसले.
त्यांची झडतीमध्ये एकुण किं. रु. २२,५८,२००/- रु.कि.चा ऐवज त्यामध्ये २१,३८,२००/- रू कि चे १०६ ग्रॅम ९१ मि. ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, ४०,०००/- रू कि ची मोपेड व ८०,०००/- रू किं चे दोन मोबाईल संच असा ऐवज मिळून आला. पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांनी त्याच्या विरुध्द भारती विदयापीठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण करीत आहे. सदरील कारवाई ही पोलीस आयुक्त, पुणे अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-२. चे पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, पोलीस उपनिरीक्षक, रामकृष्ण दळवी, पोलीस उपनिरीक्षक, दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, रविन्द्र रोकडे, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, दिशा खेवलकर, साहिल शेख, संदिप शेळके, नितीन जगदाळे, अझीम शेख, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.
