लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : केसनंद लोणीकंद रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाला. ही घटना २८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.
या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये कमलेश शिंदे पोलीस अंमलदार लोणीकंद यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात वाहन चालक धडक दिल्यानंतर पळून गेला आहे.
केसनंद लोणीकंद रोड झेंड वाईन समोर केसनंद येथे अज्ञात वाहन चालकाच्या ताब्यातील वाहन हे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगात चालवुन, एका अनोळखी इसमास (वय २५ ते ३० वर्षे) यांस जबर धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. हा तपास सहा. पोलीस निरीक्षक भालेराव करीत आहेत.
