खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भवानी पेठेत छापा टाकून राज्यात प्रतिबंधित असलेला १४ लाख रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. याप्रकरणी कामरान मुर्तुजा खान (२८), अमन मोहंमद इस्लामुद्दीन (३१, दोघेही रा. भवानीपेठ, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांच्याविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मीनारायण सोसायटी भवानीपेठ येणे प्रतिबंधित गुटख्याचा साठा करून ठेवला आहे. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता, कामरान याच्याकडे ७ लाख ४७ हजार रुपयांचा, तर अमन याच्याकडील टेम्पोत ६ लाख ५३ हजार रुपये किंमतीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा मिळून आला.
अधिक माहितीनुसार, पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत असताना, त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, लक्ष्मीनारायण सोसायटी ८३ भवानी पेठ पुणे येथे प्रतिबंधीत गुटख्याचा साठा करुन ठेवला आहे.
वरिष्ठांच्या परवानगीने शब्बीर सय्यद व युनिट १ कडील पोलीस पथकाने खात्री करुन अचानक छापा टाकला. कामरान मुर्तुजा खान, (वय २८ वर्षे, रा. अंरशहा तकीया, स्वामी समर्थ मंदिराजवळ, १७ भवानी पेठ, पुणे) जवळ एका फ्लॅट मध्ये ७,४७,१८०/- किंमतीचा व अमन मोहम्मद इस्लामुद्दीन, (वय ३१ वर्षे, रा. स्वामी समर्थ मंदिरा शेजारी, अंगारची तकीया जवळील वाड्यात, भवानी पेठ पुणे, मुळगाव राज्य उत्तर प्रदेश) यांचा ताब्यातील टेम्पो मध्ये ६,५३,४००/-किंमतीचा असा एकुण १४,००,५८०/- किंमतीचा विमल पान मसाला, आर. एम. डी माणिकचंद, राजनिवास पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, तुलसी पान मसाला असा माल मिळून आला.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १. पुणे शहर, गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट ०१, शब्बीर सय्यद सहा. पोलीस. निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार महेश बामगुडे, आण्णा माने, राहुल मखरे, शशीकांत दरेकर, अभिनव लडकत, निलेश जाधव, अय्याज दड्डीकर, अनिकेत बाबर, विठ्ठल साळुंखे, निलेश साबळे, दत्ता सोनवणे, शुभम देसाई, प्रफुल्ल शेलार यांनी केली आहे.
