महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
आकुर्डी : प्रा. तेजश्री देवकुळे आणि पूनम मुळे यांनी लिहीलेले रसायन शास्त्रावरील पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.
आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. तेजश्री देवकुळे आणि प्रा. पूनम मुळे यांनी एकत्रितपणे पीसीआय पाठ्यक्रमानुसार औषधी रसायन शास्त्र प्रात्यक्षिक संदर्भातील पुस्तकाचे लिखाण केले.
हे पुस्तक प्रितम प्रकाशन, जळगाव यांच्या तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे व ते द्वितीय वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यां साठी उपयोगी आहे. सहज पद्धतीने समजेल अशी रचना असलेले हे पुस्तक विद्यार्थ्यांना रसायन विषयाची प्रात्यक्षिके करतांना खूपच उपयोगी पडेल असे मत प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी व्यक्त केले.
पुस्तकाबद्दल डॉ. निरज व्यवहारे यांनी प्रा. तेजश्री देवकुळे आणि प्रा. पूनम मुळे यांचे अभिनंदन केले.
