विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबई क्राईम ब्रँच ऑफीसर बोलत आहे असे खोटे सांगुन एका तरुणाची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरवळ (जि.सातारा) येथील तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने माहिती तंत्रज्ञान कायद्यन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी मोबाईल धारक तरुणाने आपण मुंबई क्राईम ब्रँच ऑफीसर बोलत आहे असे खोटे सांगुन फिर्यादी यांचे नावाने मुंबई येथुन इरानला पार्सल पाठविले आहे.
सर्व केस क्लिअर करण्यासाठी फिर्यादी यांना एनओसी सर्टीफिकेट देतो असे सांगुन बँक खात्याची माहीती घेवुन मनी लाँड्रींग बाबत चौकशी करण्याचे बहाण्याने फिर्यादी यांच्या यांच्या बँकखात्यामधुन १०,६३,५९०/- रु. ऑनलाईन ट्रान्सफर करुन घेतले. हा तपास पोलीस निरीक्षक अरुण घोडके करीत आहेत.
















