महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) उपायुक्त दर्जाच्या १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश गृह विभागाने बुधवारी (दि ७ जुलै) रोजी काढला आहे.गोंदियाचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे आणि नांदेडमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांची पुण्यात उपायुक्तपदी बदली झाली.
पुण्यातील परिमंडळ चारचे उपायुक्त विजयकुमार मगर यांची लातूरमधील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी बदली झाली आहे. राज्यातील अन्य अधिकारी, सध्याचे आणि कंसात बदलीचे ठिकाण : विनयकुमार राठोड-उपायुक्त वाहतूक, ठाणे शहर (अधीक्षक ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर) : अविनाश बारगळ अधीक्षक,
गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती (अधीक्षक, बीड) : अविनाश कुमार-अतिरिक्त अधीक्षक, नांदेड (अधीक्षक, नांदेड) : दिगंबर प्रधान-अधीक्षक, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (उपायुक्त, मुंबई) : मोहन दहीकर-अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे (उपायुक्त, ठाणे शहर) : प्रकाश जाधव-उपायुक्त, मुंबई (सहाय्यक महानिरीक्षक, मुंबई) : गोरख भामरे-उपायुक्त नागपूर (अधीक्षक, गोंदिया) : जी. श्रीधर-अधीक्षक,
हिंगोली (उपायुक्त, पुणे) : प्रियांका नारनवरे-समादेशक राज्य राखीव पोलिस दल, नागपूर (अधीक्षक लोहमार्ग, नागपूर); तसेच मनीष कलवानिया, श्रीकृष्ण कोकाटे आणि नंदकुमार ठाकूर यांच्या पदस्थापनेचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे.