विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर ट्रेडींग करण्याच्या बहाण्याने विविध बँक खात्यावर ३०,०००,००/- रुपये ट्रान्सफर करण्यास सांगुन फसवल्याची घटना विमाननगर परिसरात घडली आहे.
या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि.१६ डिसेंबर २०२३ ते१२ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ही घटना घडली आहे. ऑनलाईन माध्यमाव्दारे यातील फिर्यादी यांना तरुणाने मोबाईलवर संपर्क करुन शेअर ट्रेडींग करीता फ्री मध्ये टिप्स देण्यात येतील असे सांगितले.
शेअर ट्रेडींगमध्ये चांगला प्रॉफीट होईल असे सांगुन फिर्यादी यांना अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. खोटी शेअर ट्रेडींग करुन घेण्याकरिता ट्रेडींग करण्याच्या बहाण्याने विविध बँक खात्यावर ३०,०००,००/ रुपये ट्रान्सफर करण्यास सांगुन रक्कम फिर्यादी यांना परत न देता ऑनलाईन फसवणुक केली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सर्जेराव कुंभार करीत आहेत.