महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रसंत आचार्य प. पु. श्री आनंदऋषीजी म. सा. यांची १२४ वी जन्म जयंती जप, तप व रक्तदान शिबीराच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
बिबवेवाडी जैन स्थानक येथे महाराष्ट्र प्रवर्तिनी श्रमणी सूर्या, प. पु. डॉ. श्री. ज्ञानप्रभाजी म. सा. च्या सुशिष्या तपस्वी रत्न- प. पु. श्री पुष्पचुलाजी म. सा., अनुशासनप्रिय प. पु. श्री सुप्रियदर्शनाजी म. सा. आदी ठाणा ५ यांचा चातुर्मास मोठ्या उत्साहात मध्ये सुरु आहे.
राष्ट्रसंत आचार्य प. पु. श्री आनंदऋषीजी म. सा. यांची १२४ वी जन्म जयंती जप, तप व रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी प. पु. श्री सुप्रियदर्शनाजी म. सा. यांनी संगितले की “आचार्य आनंदऋषिजी म. सा. हे जैन धर्माचे गुरु होते. त्यांनी कन्याकुमारी ते कश्मिर पर्यंतचा पायी प्रवास करून उदभोदन करण्याचे कार्य केले व २२ संप्रदाय वेगळे वेगळे असताना त्यांना एकत्र करण्याचे काम त्यांनी केले व त्या सर्वांनी आचार्य हे पद त्यांना बहाल केले.
त्यांच्या मंत्रांच्याद्वारे अनेकांना गुण आलेले आहेत. या निमीत्ताने अनेकांनी उपवास, आयंबील करून जन्मजयंती साजरी केली. सामाजीक उपक्रमातुन जय आत्मानंद ग्रुप आणि जय आनंद ग्रुपच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यावेळेस ७२ जणांनी रक्तदान केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोपटलाल ओस्तवाल, माणिक दुगड, रमेशलाल गुगळे, पन्नालाल पितळिया, गणेश ओसवाल, लालचंद कर्नावट, अविनाश कोठारी, चंद्रकांत लुंकड, प्रवीण चोरबोले, कीर्तिराज दुगड, बाळासाहेब कोयाळीकर, प्रकाश गांधी, सुभाष बाफना, रमणलाल लुंकड, संपत भटेवरा, विजय समदडीया, चंद्रकांत सुराणा, चंपालाल नहार, रामलाल संचेती तसेच जय आत्मानंद ग्रुप आणि जय आनंद ग्रुपच्या सदस्यांनी बहुमोल योगदान दिले.