पोलिसांचा छापा : सापळा रचून तिघांना अटक
पुणे : पोलिसदलातील गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने विश्रांतवाडीतील टिंगरेनगर परिसरात छापा टाकून एक कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आणि तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवास संतोष (वय २१, रा. धानोरी), रोहित शांताराम बेंडे (वय २१, रा. लोहगाव), निमिश सुभाष अबनावे (वय २७, रा. टिंगरेनगर, लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
टिंगरेनगर येथील विघ्नहर्ता अपार्टमेंट येथे तीन जण आले बसून, त्यांच्याकडे अमली पदार्थ असल्याचा संशय असल्याची खात्रीशीर माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार अमलीपदार्थ विरोधी पथकाने तेथे जाऊन सापळा रचला असता, संशयित तिघे रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसले.
त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून ४७१ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), ४ मोबाइल, दुचाकी, कार आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे असा १ कोटी ८९ हजार ४६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
पोलिस हवालदार संदीप दामोदर शिर्के यांच्या फिर्यादीवरूनविश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ही, पोलीस उप आयुक्त, अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १ गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस उप निरीक्षक दिंगबर कोकाटे, पोलीस उप निरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, सचिन माळवे, मारुती पारधी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, रेहना शेख, नुतन वारे, नितेश जाधव, विनायक साळवे, विपुल गायकवाड, योगेश मोहिते, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी यांनी केली आहे.