फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रविवार पेठेतील एका ज्वेलर्सच्या दुकानातून मुकबधीर चोराने सुमारे १४ लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.
फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार पेठेतील शितलादेवी मंदिर परिसरात फिर्यादीचे दुकान आहे. दागिने खरेदीच्या बहाण्याने त्याने १३,६६,१३६/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा तपास पोलिस उप.निरीशक अरविंद शिंदे करीत आहेत.