1 लाख 45 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : सोलापूर तालुका पोलिसांनी शिताफीने तपास करीत परिसरात घडलेल्या सहा घरफोडीच्या गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे, दोन जणांना अटक केली असुनचोरट्याकडून एकूण 1 लाख 45 हजार 995 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 28.जुलै फिर्यादी रविंद्र मधुकर शिंदे (वय 36 रा.पाकणी ता.उत्तर सोलापूर जि. सोलापूर) यांचे पाकणी येथील स्वराज्य परमीट रूम व बारच्या किचनच्या खिडकीचे लोखंडी गज चोरटयाने तोडूनपरमीट बार मधील 36,800/-रूपये किंमतीची देशी विदेशी दारू चोरून नेली होती.
गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटकरणातील पोलीस हवालदार राहुल महिंद्रकर यांचेकडे देण्यात आला होता, पोलीस अंमलदार राहुल महिंद्रकर शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक. राहुल देशपांडे यांचे नेतृत्वाखाली तपास करीत होते.
पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना त्यांचे गोपनिय बातमीदार यांचेकरवी गुन्हा रानमसले येथीलआरोपी यांनी त्यांचे साथीदारसह केला असल्याची बातमी मिळाली होती. त्याप्रमाणेराहुल देशपांडे यांनी गुन्हे प्रकटीकरणातील अंमलदार यांना सांगुन सूचना दिल्या होत्या.
त्या प्रमाणे अंमलदार यांनी दोन्ही संशयित आरोपीचा शोध घेतला. रामचंद्र उर्फ पिंट्टया हरीषचंद्र काळे (वय 32)व किसन गंगाराम पवार (वय 48 ) (दोघे रा.रानमसले ता.उत्तर सोलापूर )यांना ताब्यात घेऊन त्याचे अधिक विचारपूस करून तपास केला.
सुरूवातीस त्या दोघांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर त्या दोघास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस करून तपास केला असता त्या दोघांनी गुन्हयाची कबुली दिली होती. पोलोस कस्टडी दरम्यान त्या दोघांचे विचारपूस करता गुन्हयातील 15,010/-रूपये किंमतीचा मुद्देमालहस्तगत केला आहे.
मोटारसायकल 52,500/-रूपये किंमतीचा मुद्देमाल मोहोळ पोलीस ठाणे गुन्हयातील 48,000/-रूपये किंमतीचे एलोरा कंपनीचे कांदा बीयाचे एकूण 40 पॉकीट 12,470/-रूपये किंमतीच्या विविध कंपनीच्या तेलाच्या बाटल्या वैराग पोलीस ठाणे गुन्हयातील 10,300/-रूपये किंमतीचे 40 इंची टी. व्ही ड्रील मशीन, घरफोडी चोरी करणे करीता वापरलेली हत्यार हस्तगत केले आहे.
सदर दोन्ही संशयित आरोपी हे सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस सोयाबीन चोरीच्या गुन्हयातील पाहिजे असलेले आरोपी आहेत. आरोपी यांचेकडुन आणखी गुन्हे उकल होण्याची शक्यता असल्याचे . संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरणातील सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे, पोहवा/राहुल महिंद्रकर, लालसिंग राठोड, अनंत चमके, नागेश कोणदे, अभिजित सांळुखे, पोलीस अंमलदार पैंगबर नदाफ, फिरोज बारगीर व वैभव सुर्यवंशी यांनी पार पाडली आहे.