महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : येवलेवाडी परिसरातील बंद घर फोडून चोरट्यांनी १,९१,०००/- रू. किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज घरफोडी करून नेला.
या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ०४ ते ०५ ऑगस्ट दरम्यान सकाळी ७:०० च्या दरम्यान घडली. अर्जुन मुक्ताई बिल्डींग कोंढवा हॉस्पिटलजवळ, येवलेवाडी फिर्यादी यांचे राहते घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील १,९१,०००/- रू. किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला.