हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सोसायटीतील घरकाम करणाऱ्या महिलेने मालकाची नजर चुकवून २,१९,५००/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १६ मार्च ते ९ ऑगस्ट दरम्यान घडली आहे. सी-२ फ्लॅट नं.९०२ व फ्लॅट नं. ११०२, कुमारसिएन्ना सोसायटी, एचडीएफसी स्कुलच्या शेजारी, मगरपट्टा, हडपसर मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तक्रार दिली आहे.
दोन्ही घरात हि महिला काम करत होती. मालकांची नजर चुकवून तिने दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा तपास सहायक पोलीस निरीशक संदिप मधाळे करीत आहे.














