चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तुम्ही इराणला पाठवलेले पार्सल पोलिसांनी अडवून ठेवले आहे. तसेच तुमच्या आधारकार्ड वरून गैरव्यवहार होत असल्याची भीती दाखवून तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना खराडी परिसरात घडली आहे.
या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यातगुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २७ जून रोजी फिर्यादी यांना अज्ञात मोबाईल धारकांने फेडेक्स मुंबई कंपनीच्या नावाने कॉल केला. फिर्यादीच्या नावाने मुंबई वरून इराण कडे ड्रग्जचे पार्सल पाठविले असुन ते पार्सल फेडेक्स मुंबई मेन ब्रँचने पकडुन ठेवले आहे.
तसेच आधार कार्डाचा वापर मनीलाँड्रीगसाठी होण्याची शक्यता आहे. तुम्ही बँके खातेचा नंबर द्या असे सांगितले. त्यानंतर त्या युवकाने त्यांच्या खात्यातून २० लाख रुपये ट्रान्सफर करुन घेतले. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने करीत आहेत.