सिंहगड रोड पोलिसांनी केली आरोपीस अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भात लावण्यासाठी नेलेल्या मजुरास चोरी करण्यास भाग पाडले. तेव्हा तो खांबावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला. त्याची माहिती न देता त्याला खड्ड्यात पुरणाऱ्या राजगड(वेल्हा) तालुक्यातील दोन आरोपींना सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिसिंग व्यक्तीस डोंगरात खड्डा करुन गाडणाऱ्या आरोपींस ताब्यात घेवून गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. बसवराज पुरखंत मंगळूरे (वय २२ वर्ष रा. जाधवनगर, गल्ली नंबर १, निराकुंज बिल्डीग शेजारी, वडगाव. पूणे मुळ गाव तोळनुर, ता अक्कलकोट, जि सोलापर) हा २३ जुलै पासून बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल आहे.
पोलीस तपासामध्ये बसवराज हा त्याचा मित्र सौरभ रेणुसे (रा. मु पो पाबे, ता. वेल्हा, जिल्हा पुणे) याच्यासोबत दि. १२ जुलै २०२४ रोजी भात लावणीसाठी पाबे गावी गेला होता, असे उघड झाले. दि. १३ जुलै रोजी बसवराज मंगळूरे हा मित्र सौरभ रेणुसे व रुपेश येनपुरे यांच्यासोबत (मु.पो रांजणे ता. वेल्हा, जिल्हा पुणे) याठिकाणी टॉवरवर चढून तार ब्लेडने कापत असताना टॉवर वरुन खाली जमिनीवर पडला.
सौरभ रेणुसे, रुपेश येनपुरे यांनी बसवराज यास उपचार कामी हॉस्पीटलमध्ये न नेता पाबे घाटाजवळील जमिनीत खड्डा करून पुरले अशी माहीती प्राप्त झाली. प्राप्त माहीतीच्या अनुषंगाने सिंहगड रोड पोलीस ठाणे, कडील पोलीस उप. निरीक्षक निंबाळकर, पो.उप.नि. भांडवलकर, पोलीस उप निरीक्षक जायभाय व इतर पोलीस स्टाफ यांनी रुपेश येणपुरे, सौरभ रेणुसे यांच्यासह पाये (ता. वेल्हा, जिल्हा, पुणे) याठिकाणी जावुन तपास केला.
स्थानिक पोलीसांची मदत घेवून मयूर बनसोडे निवासी नायब तहसीलदार वेल्हा यांच्यासमक्ष सौरभ रेणूस याने दाखविलेल्या ठिकाणाची जमीन उकरली. या ठिकाणी बसवराज मंगळूरे याचा मृतदेह हा गाडलेल्या अवस्थेत मिळुन आला. बसवराज मंगळुरे यास सौरभ रेणुसे याने भात लावणीसाठी गावी नेले.
बसवराज याला सौरभ रेणुसे, रुपेश येणपुरे यांनी एमएसईबीच्या टॉवरची तार चोरणेसाठी नेले. सौरभ रेणुसे, रुपेश येणपुरे यांनी बसवराज मंगळुरे यास टॉवरवर तार कापण्यासाठी वर चढवले. त्यावेळी, बसवराज हा टॉवरवरुन खाली पडला.
त्यावेली त्याला सौरभ रेणुसे, रुपेश येणपुरे यांनी उपचारकामी हॉस्पीटलमध्ये न नेता, पाबे घाटातील जंगलात खड़ा करुन पुरल्याचे निष्पन्न झाले. सदर घटनेबाबत मयत बसवराज मंगळुरें याची आई श्रीदेवी पुरवंत मंगरुळे संगिनमणी (वय ४० वर्ष रा. मु पो लोळणूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापुर) यांनी आरोपी रुपेश अरुण येनपुरे, सौरभ बापू रेणुसे यांच्या विरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा प्रकार वेल्हा पोलीस स्टेशन हदीत घडला असल्याने, गुन्हा पुढील तपासकामी वेल्हा पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांचेकडे पाठविण्यात आला आहे, पुढील तपास वेल्हा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, राघवेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर, सुरेश जायभाय, निकेतन निंबाळकर, पोलीस अंमलदार, सतिश नागुल, सुहास गायकवाड, सचिन गायकवाड, नवनाथ वणवे, शिवाजी क्षिरसागर, राजाभाऊ वेगरे, उत्तम तारु यांच्या पथकाने केली.