येरवडा पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वडगाव शेरीतील तरुणाच्या खुनाच्या गुन्हयात ०९ महीन्या पासुन फरार असलेल्या आरोपीस येरवडा पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक राठोड (वय २२) हा ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री करणसिटो सोसायटी जवळ वडगावशेरी येथे गेला होता. त्यावेळी दादया पाटोळे व त्याचे इतर साथीदार यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यास लोखंडी धारदार शस्त्राने मारुन त्याचा खुन केला. त्या बाबत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयातील आरोपी ओम रामचंद्र गोरे हा गेल्या ०९ महीन्या पासून फरार होता. दि. १२ ऑगस्ट रोजी पोलीस अंमलदार राहुल परदेशीयांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, येरवडा पोलीस स्टेशन कडील खुनाच्या गुन्हयातील फरारी असलेला आरोपी ओम रामचंद्र गोरे हा नगर रोड येथील वाडीया बंगला, जवळील फुटपाथवर थांबलेला आहे.
लागलीच वरिष्ठांच्या परवानगीने गुन्हे शाखा, युनिट ४, पुणे शहर कडील पथक वाडीया बंगला, नगर रोड, जवळ गेले. तेथे फुटपाथवर युवक थांबलेला दिसुन आला त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याचे नाव-पत्ता विचारता त्याने आपले नाव ओम रामचंद्र गोरे (वय २० वर्षे रा. मारुली चौक, जयप्रकाशनगर, येरवडा) असे असल्याचे सांगितले.
दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, यांचे मार्गदर्शनात युनिट ४ कडील पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, पोलीस अंमलदार हरिष मोरे, प्रविण भालचिम, संजय आढारी, विशाल गाडे, एकनाथ जोशी, नागेसिंग कुंवर, विनोद महाजन, जहाँगीर पठाण, वैभव रणपिसे, राहुल परदेशी, विशाल इथापे, देविदास वांढरे, शितल शिंदे यांनी केली आहे.