महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे संचालक विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. राजेंद्र डहाळे यांना भारत सरकार यांच्या उल्लेखनीय सेवेबाबत राष्ट्रपती पोलीस पदक १५ ऑगस्ट च्या अनुषंगाने जाहीर केले आहे.
डॉ. डहाळे यांना यापूर्वी गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे पोलीस पदक ते “पोलीस अधीक्षक, नंदूरबार” या पदावर कार्यरत असताना १५ ऑगस्ट २०१७ रोजीच जाहिर केले होते. डॉ. डहाळे यांनी त्यांच्या ३१ वर्षाच्या सेवेमध्ये उत्कृष्ठ सेवेबद्दल दोन वेळा पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह देवून गौरविले आहे.
डॉ. डहाळे यांनी यापूर्वी “पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे, पुणे शहर” या पदावर कार्यरत असताना सायबर फॉरेन्सिक लॅबच्या निर्मितीमध्ये प्रमुख भूमिका बजावली होती.
त्याबद्दल पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी त्यांचा गौरव केला होता. तसेच, “अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर” या पदावर कार्यरत असताना श्री. गणेश उत्सव व इतर वेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्था उत्कृष्ठपणे ठेवल्याबददल वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान केला आहे.
डॉ. डहाळे यांनी यापूर्वी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग या व इतर विभागात डॉ. राजेंद्र डहाळे यांनी उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे.
















