महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये अधिकारी व कर्मचारी यांना १५ ऑगस्ट २०२४ करिताचे राष्ट्रपतींचे सेवापदक केंद्रीय गृह विभागाकडून जाहिर करण्यात आले आहे.
राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे पदक
१) नितीन भालचंद्र वायचळ, प्राचार्य, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा,
२) शिवाजी पांडुरंग जाधव, तुरुंग अधिकारी श्रेणी १ ठाणे मध्यवर्ती कारागृह
३) दिपक सुर्याजी सावंत, सुभेदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह
४) जनार्धन गोविंद वाघ, हवालदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह यांना जाहीर झाले आहे.
तर राष्ट्रपतींचे वैशिष्टपूर्ण सेवेबाबतचे पदक अशोक बुवाजी ओळंबा, हवालदार, मुंबई मध्यवर्ती कारागृहअ यांना जाहीर झाले आहे.