महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ चे उद्घाटन शनिवारी (दि. १७) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-बंगळुरू महामार्गावर (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) शनिवारी (दि. १७) सकाळी ६ ते रात्री ८ या कालावधीत अवजड वाहनांना प्रवेश बंद असेल, कात्रज चौकापासून पुढे नवले बीज कडून जाणारा मुंबई-बेंगलोर बायपास रोडवर सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांना प्रवेश बंद राहिल. असे पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखा अमोल झेंडे यांनी जाहीर केले आहेत.
बाणेर रस्त्याने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळून किया शोरूम कडील अंडरपास किंवा ननावरे कडील अंडरपास मार्गे ने जावे त्याचंप्रमाणे मुंबई-बंगळूर महामार्गावरून बाणेर रोडवर जाणाऱ्या वाहनांनी बालेवाडी जकात नाका येथून डावीकडे हायस्ट्रीटमार्गे गणराज चौकातून जावे;
पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर रस्ता मार्गे न जाता पाषाण रस्त्यावरून चांदणी चौक मार्गे किंवा पुणे विद्यापीठ चौकातून औंध रोडमार्गे जावे;
पुणे विद्यापीठ चौक ते चांदणीचौक पाषाण रोड, पुणे विद्यापीठ चौक ते राधा चौक-बाणेर रोड, पुणे विद्यापीठ चौक ते राजीव गांधी पूल-औंध रोडवर शनिवारी पूर्ण दिवसभर अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल .
बालेवाडी क्रीडा संकुल जवळील राधा चौक ते मुळा नदी पुलापर्यंत सेवा रस्त्यावर प्रवेशबंदी असेल , कार्यक्रमाला येणारी वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहने या मार्गेने जाऊ शकतील; बालेवाडी परिसरात वाहनासाठी पार्किंग व्यवस्था असेल, या ठिकाणच्या मार्गावर जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे.
मुंबई-बंगळूर महामार्गावरून चांदणी चौक ते उर्से टोल नाका येण्या-जाण्यास बंदी असेल ; चाकणकडून पिंपरी-चिंचवड मार्गेकडून बंगळूर महामार्गाकडे येण्यास बंदी असेल ; पुण्याहून मुंबईकडे व मुंबई-बंगळूर महामार्गावर जाण्यास बंदी असेल ; तळेगाव, देहूरोडमार्गे मुंबई-बंगळूर महामार्गावर येण्यास बंदीकरण्यात आली आहे.