येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कल्याणीनगर घरफोडी करणाऱ्या आरोपीना गुन्हे शाखा, युनिट- ४ च्या पथकाने जेरबंद केले आहे. कल्याणीनगर येथील दुकान बंद असताना चोरटयाने दुकानाची खिडकी तोडुन आत प्रवेश करुन दुकानातील रोख रक्कम व कपडे असे एकुण १,९९,०००/- रुपये किमतीचे मुद्देमाल चोरुन नेला. येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा, युनिट-४ कडील पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, व यांच्या पथकाने घटनास्थळी व आजुबाजुच्या ठिकाणी उपलब्ध असलेले सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
रांजणगाव, संकल्प सिटी गणेगाव रोड, येथे जावुन येथील स्थानिक नागरिकानां आरोपीयांचे फोटो दाखवुन तपास सुरु केला असता बातमीदार कडुन बातमी मिळाली की, फोटोतील इसम हे संकल्प सिटी, मधील मानवी अर्मिट रांजणगाव येथे भाडयाने राहत आहे.
पोलीस पथकाने संकल्प सिटी, मानवी अर्पामेंट रांजणगाव येथे पाळत ठेवून कारवाई केली. १५ ऑगस्ट रोजी तीन जण पार्किंग मधील पल्सर मोटार सायकलजवळ, आले असता त्यास घेराव घालुन त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी विवेक उर्फ गुरुदेव मनिराम राजपुत (वय ३० वर्षे) २) अभिषेकसिंग उर्फ प्रदिप पप्पूसिंग (वय २५ वर्षे) ३) अमितसिंग विजयसिंग (वय ३१ वर्षे) हे सर्व सध्या राहणार संकल्प सिटी, मानवी अर्पामेंट फ्लॅट नं. १०३, रांजणगाव पुणे यांना येथून ताब्यात घेतले आहे. त्यांनी चोरीची कबुली दिली आहे.
त्यांच्याकडून रोख रक्कम, व दोन शर्ट, एक लेडीज ड्रेस च पल्सर मोटार सायकल असा एकुण १,१६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनात युनिट ४ कडील पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक, वैभव मगदूम, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, येरवडा पोलीस स्टेशनचे अंमलदार हरिष मोरे, प्रविण भालचिम, संजय आढारी, विशाल गाडे, एकनाथ जोशी, नागेसिंग कुंवर, विनोद महाजन, जंहागीर पठाण, वैभव रणपिसे, राहुल परदेशी, देविदास वांढरे, विशाल इथापे, मनोज सांगळे, सुशांत भोसले व प्रशांत कांबळे यांनी केली आहे.