डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कर्वेनगरला भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली. श्री. भागीरथी ज्वेलर्स समोर १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर चालक पळून गेला आहे.
या प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात मोटार सायकलला धडक बसल्याने सुनिल भास्करराव देशमुख (वय ६४ वर्षे, रा. विमाननगर) यांचा खाली पडून मृत्यू झाला. त्यांच्या मुलाने पोलिसात तक्रार दिली आहे. हा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कुलकर्णी करीत आहेत.