मोशीत पूजा करतानाची घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : इंद्रायणी नदीची पूजा करण्यासाठी गेलेल्या मुलाचा जीव वाचविताना दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दि. १९ सकाळी ८:३० वाजता मोशी येथील तापकीर वस्ती येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी परिसरातील हवालदार वस्ती महेश नंदे गुरुजी यांचे वैदिक विद्यालय आहे. तेथील ७१ मुले सोमवारी सकाळी ८:३० च्या सुमारास श्रावणी सोमवारनिमित्त नदी पूजनासाठी इंद्रायणी नदीवर गेली होती.
पाण्याचा अंदाज न आल्याने जय दायमा हा नदीत पडला. ही बाब लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी प्रणव रमाकांत पोतदार (वय १६, रा. कडा, ता. आष्टी, जि. बीड), ओंकार श्रीकृष्ण पाठक (वय १६, रा. पद्मावती गल्ली, लातूर), अर्चित दीक्षित, चैतन्य पाठक, महेश नंदे गुरुजी हे पाण्यात उतरले.
तर त्यात दायमा यांच्यासह अर्चित, महेश नंदे हे पाण्या बाहेर आले. ओंकार आणि प्रणव हे दोघे पाण्यात बुडाले व त्यांचा मृतदेह सापडला आहे. त्यानंतर या घटनेची माहिती महेश नंदे गुरुजी यांनी पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागास दिली. त्यानंतर ‘एन.डी.आर.एफ’, पिंपरी चिंचवड आपत्ती व्यवस्थापन विभाग, जय दायमा याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असून, त्यावर उपचार सुरू आहेत.














