भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महावितरणचे रोहीत्र फोडून कॉपर कॉईलची चोरी करण्याचा प्रकार कात्रज नजीक उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवलींग बोरे (वय ४७ वर्षे, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. निखील मार्बल जवळ, माऊली – नगर, कात्रज कोंढवा रोड, भिलारेवाडी येथील महावितरणचे रोहीत्र फोडून कॉपर कॉईलची चोरी करण्यात आली आहे. चोरट्यांनी रोहीत्र मधील १,१२,०००/- रुपये किमतीचे कॉपर कॉईल चोरून नेले. हा तपास पोलीस अंमलदार हनुमंत मासाळ करीत आहेत.