कोंढवा पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भरदिवसा गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
तेव्हा पोलीस अंमलदार अजिम शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम हा कोंढवा येथील सार्वजनिक ठिकाणी गांजा विक्रीकरिता घेवून येणार आहे. ही माहिती मिळाल्याने अमली पदार्थ विरोधी पथकाने तेथे जाऊन कारवाई केली असता मोबीन अब्दुल रशीद शेख (वय 37 वर्ष रा. सदर बाजार सोलापूर) हा तेथे आढळून आला.
त्याची झडती घेतली असता १२ किलो गांजा व मोबाईल असा २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस उपनिरीक्षक घुले, पोलीस अंमलदार साहिल शेख, अज़ीम शेख, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदीप शेळके, संदीप जाधव, नितीन जगदाळे, निलम पाटील यांनी केली आहे.