पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी राबवली ऑलआऊट मोहीम
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस पदाची सूत्रे हाती घेताच अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सुधारण्यावर तसेच गुन्हेगारावर पोलिसांचा दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ऑलआऊट मोहीम राबवली. अभिलेखावरील हिस्ट्रीशीटर, रेकॉर्ड वरील आरोपी पाहणी केले असता सोलापूर ग्रामीण जिल्हयात ऑलआऊट ऑपरेशन ही मोहीम राबविण्यात आली होती.
अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर संकेत देवळेकर व उपविभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, तसेच प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली ऑलआऊट मोहीमे दरम्यान सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरणातील तसेच पोलीस ठाणे कडील अंमलदार यांनी सहभाग नोंदविला होता.
ऑलआऊट मोहीमे दरम्यान सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या अभिलेखा वरील 2 प्लस मधील 7 आरोपी यांची पाहणी केले. त्यापैकी 4 आरोपी मिळुन आले व त्यापैकी 3 आरोपी जेल मध्ये आहेत. रेकॉर्ड वरील 8 आरोप्यांची पाहणी केली असता 11 हिस्ट्रीशीटर यांचीही पाहणी केली त्यापैकी 5 मिळुन आले होते.
मिळुन आलेल्या सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावुन त्यांचेकडे चौकशी करून त्यांना गुन्हे करण्यापासुन परावृत्त केले आहे. सोलापूर तालुका, पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हयातील आरोपीचा शोध घेऊन त्यास शिताफीने पकडुन तपासकामी ताब्यात घेण्यात आले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर, ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर संकेत देवळेकर, उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर राहुल देशपांडे व पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस स्टेशन कडील गुन्हे प्रकटीकरणातील व इतर पोलीस अंमलदार यांनी पार पाडली आहे.