वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणें: स्वातंत्र्यदिनी अवैधधंद्याविरुद्ध पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत वारजेमाळवाडी येथे सराईत गुन्हेगार गावठी पिस्टलसह जेरबंद करण्यात आला आहे.
स्वांतत्र्यदिनाच्या अंनुशंगाने गुन्हे शाखा युनिट ३ मधील अधिकारी व स्टाफ रेकॉडवरील गुन्हेगार व अवैध्य धंदयावर कारवाई करण्याकरिता गस्त करित होते. तेव्हा पोलीस अंमलदार प्रतिक मोरे यांना माहिती मिळाली की, अप्पर डेपो, बिबवेवाडी, येथे गणेश उदय जाधव (वय २१ वर्षे, रा. गणेश नगर सोसायटी, वारजे माळवाडी) याने एका इसमास धमकवण्यासाठी पिस्टल दाखवला होता.
तो सध्या गणेश पुरी, रामनगर, वारजे माळवाडी, रोडवर थांबलेला आहे. या माहितीनुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जावुन शोध घेतला. तेथे त्याच्याकडे ४,००००/- रुपये किमतीचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल मिळुन आले. गणेश जाधव वर खून व बेकायदेशिर जमाव जमवुन दुखापत करणे असे कोथरूड व सिंहगड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद आहे. त्याच्या विरुध्द अग्नीशस्त्र बाळगले बाबत पोलीस अंमलदार प्रतिक मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरिक्षक, युनिट ३ गुन्हे शाखा रंगराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार शरद वाकसे, विनोद भंडलकर सुजित पवार, केदार आढाव, संजीव कळंबे, इसाक पठाण, हरिष गायकवाड, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, प्रतिक मोरे, गणेश शिंदे, सोनम नेवसे यांनी केलेली आहे.