वारजेत दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दुचाकी चोरणा-या विधीसंघर्षग्रस्त बालका कडुन ०८ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन ०५ दुचाकी गाड्या व ०३ ऑटो रिक्षा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली.
गेल्या काही महिन्यात पुणे शहर व परिसरात दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी पुणे शहरामध्ये दुचाकी वाहनांच्या चोरीला आळा बसावा याकरीता विशेष मोहिम राबवुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गुन्हयातील आरोपीचा व चोरीस गेले दुचाकी गाडीचा शोध घेत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे येथे असलेल्या मोकळया मैदानाजवळ एक मुलगा चोरीस गेलेल्या दुचाकी गाडीसह उभा आहे. त्यानुसार पोलिसांनी तातडीने तेथे जावून कारवाई केली व मुलाला ताब्यात घेतले.
विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे त्याच्या पालकांसमक्ष आणखीन चौकशी करता त्याने ०३ ऑटो रिक्षा व ०५ दुचाकी गाड्या चोरी केल्याचे सांगितले. एकुण ०८ वाहने जप्त करुन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस उघडकीस आणुन त्याचेकडुन २,५०,०००/- रुपये किमतीची मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अमंलदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, रविंद्र लोखंडे, साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर, यांनी केली आहे.