महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा मध्यवती कारागृहामध्ये बंद्यांसाठी विविध सेवाभावी संस्थेमार्फत धार्मिक, सामाजिक, मनोरंनात्मक, समुपदेशपर असे प्रशंसनिय उपक्रम राबवून राखी पोर्णिमा साजरी करण्यात आली.
कारागृहात रक्षाबंधन “सणानिमित्त विविध सामाजिक संस्थेमार्फत कैद्यांना राखी बांधण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये श्री शिवसमर्थ भगवान अग्रेसन गोशाळा फाउंडेशन पुणे, समर्थ प्रतिष्ठान पुणे, आम्ही शाश्वत आणि सक्षम संस्था पुणे या संस्थेमार्फत कारागृहातील कैद्यांना राखी बांधण्यात आली.
रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणींच्या नात्यांचा उत्सव आहे. कारागृहातील चार भिंतीच्या आत बंदीस्त बंदीजनांनी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात यावा या उद्देशाने उपक्रम सर्वार्थाने यशस्वी होईल. असे मनोगत यावेळी संयोजकांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रम प्रशांत बुरडे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, व डॉ.जालिंदर सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) यांच्या संकल्पनेतुन व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. सदर उपक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पी पी कदम, अतिरिक्त अधीक्षक, आर. ई गायकवाड, उपअधीक्षक, एम. एच. जगताप, उपअधीक्षक, आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी यांनी प्रयत्न केले.














