०२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : मोहोळ पोलिसांनी तीन आरोपीकडून ०३ घरफोडी, ०१ जबरी चोरी व ०१ फसवणुक असे ०५ गुन्हे उघडकीस आणून त्यांच्या कडून ०२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडवळ, शिरापुर, हिवरे, मोहोळ शहर, मलिकपेठ या ठिकाणी घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे मोहोळ पोलीस ठाणेस दाखल होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत मोहोळ पोलीस ठाणे यांनी मोहोळ पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेस सुचना दिल्या होत्या.
दि. ०६ जुलै रोजी शिरापुर येथील अनिल पाटील यांचे घराचा कडी कोयंडा तोडुन न कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी झाले बाबत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील एक संशयित अक्षय उर्फ थावर मैदान भोसले (रा. कासारी ता. आष्टी जि. बिड यास ताब्यात) घेवुन त्याकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. मलिकपेठ व वडवळ येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.
११ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ०७ ग्रॅम वजनाचा सोन्याचे गलसर, ०५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुबेअसा १ लाख ८० रूपये किंमतीचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले. दि.१३ ऑगस्ट रोजी मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयातील फरारी आकाश उर्फ पपन्या संभाजी चव्हाण (वय ३४ रा. बेंबळी ता. धाराशिव जि. धाराशिव) यास धाराशिव येथुन ताब्यात घेवुन तपास केला असता त्याने मोहोळ पोलीस ठाणे हददीतील हिवरे पाटी येथील एका वृध्द महीलेस मारहाण करून तिचे गळयातील व कानातील सोन्याचे दागिने जबरीने घेवुन गेल्याची कबुली दिली.
त्याला अटक करून त्याचेकडुन ३० हजार रूपये किंमतीचे ०५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.०३ जुलै रोजी रोजी मोहोळ शहरातील एस.टी. स्टॅन्ड शेजारी वच्छला काशिनाथ जवंजाळ (रा. वाफळे ता. मोहोळ) ही कामानिमित्त येवुन पंढरपुर रोड ब्रिजच्या खाली थांबली असता गळयातील व कानातील सोन्याचे दागिने घेवुन त्या ऐवजी बनावट सोन्याचे बिस्किट देवुन एक भामटा निघुन गेला.
याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हयाचा तपास करून प्रतिक नामदेव शिंदे वय २८ रा. पानगाव ता. माण जि. सातारा) यास ताब्यात घेवुन त्याकडे विश्वासात घेवुन तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास अटक करून त्याचेकडुन ३० हजार रूपये किंमतीचे ०५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसुत्र जप्त केले.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत पोलीस उप निरीक्षक प्रविण साने, गजानन कर्णेवाड, हवालदारदयानंद हेंबाडे, सचिन माने, राहुल कोरे, रणजित भोसले, पोना/चंद्रकांत ढवळे, सिध्दनाथ मोरे, अजित मिसाळ, अमोल जगताप, सुनिल पवार, स्वप्निल कुबेर, संदिप सावंत, सायबर पोलीस ठाणे कडील युसुफ पठाण यांनी पार पाडली.














