चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भरधाव बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना गणेश खिंड रोडवरील अबिल हाऊस नजीक घडली आहे. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात दि. २० ऑगस्ट रोजी रात्री ११:३० च्या दरम्यान घडला आहे. चालकाने भरधाव बस चालवून दुचाकीला धडक दिली. त्यामुळे रस्त्यावर पडून दुचाकीवरील पाठीमागे बसलेले संतोष गिताराम ढवळे (वय ५० रा. मरळ प्लोर मिल जवळ, वाघजाईनगर रोड, आंबेगाव खुर्द, कात्रज) यांचा मृत्यू झाला. राजेंद्र पवार, ( वय ६३ वर्षे रा. महात्मा फुले पेठ, पुणे) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. हा तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले करीत आहे.














