हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : घरात देखभालीसाठी कोणी नसल्याने केअर टेकर म्हणून कामावर ठेवलेल्या कामगाराने घरातील ९ लाख रुपयांचे दागिने व महत्वाची कागदपत्रे चोरल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे.
या प्रकरणी एका ८० वर्षाच्या वृद्ध महिलेले दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झेड १०३, कॉसमॉस, मगरपट्टा, हडपसर येथे राहणाऱ्या फिर्यादी यांचे घरी १३ जुलै ते १९ ऑगस्ट दरम्यान केअर टेकरचे काम करताना त्यांचे घरातील कपाटात ठेवेलेले ९,००,०००/- रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे व इतर महत्वाची कागदपत्रे असा ऐवज चोरुन नेला. पोलिसांनी सुनिल सुदाम जगताप (वय ४८ वर्षे, रा. जयश्री निवास, मुकुंदवाडी, ता. जि. संभाजीनगर) यास अटक केली आहे. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे करीत आहेत.