चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आपण क्राईमब्रँच मुंबई येथून ऑफीसर बोलत असल्याचे सांगुन तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल आहे. त्यातून सोडवण्यासाठी २० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार खराडी परिसरात घडला आहे.
या प्रकरणी खराडी परिसरातील एका तरुणाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन माध्यमाव्दारे यातील फिर्यादी यांना एकाने मोबाईलवर संपर्क साधला.
आपण क्राईमब्रँच मुंबई येथन ऑफीसर बोलत असल्याचे सांगुन तुमच्यावर मनी लँड्रीग व बेकायदेशीर पसर्नल लोन घेतले असल्याचे सांगितले. त्यावर सर्व केस क्लिअर करण्यासाठी एनओसी सर्टीफिकेट देतो असे सांगुन मनीलाँड्रींग बाबत चौकशी करण्याचे बहाण्याने २०लाख रुपये किमतीची आर्थिक फसवणुक केली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक अनिल माने करीत आहेत.