वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आयपीओमध्ये गुंतवणुक करुन जास्त प्रमाणात मोबदला मिळेल, असे सांगून तरुणाची ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना वाघोली परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये माहिती तंत्रन्यान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी तरुणाने मोबाईलवर फिर्यादीशी संपर्क साधला.
त्यांना ग्रुपमध्ये अॅड करुन शेअर्स संबधीची मिटिंगव्दारे स्ट्रॉक्स व्दारे व आयपीओ मध्ये गुंतवणुक करुन जास्त प्रमाणात – मोबदला मिळेल, असे सांगितले. इन्स्टीट्युशनल खाते ओपन करून पैसे पाठविण्यास-भाग पाडुन ५२,९१,८१५ /- रुपये किमतीची आर्थिक फसवणुक केली आहे. हा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे करीत आहेत.