रामविलास माहेश्वरी यांचा पुढाकार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बिबवेवाडी रस्त्यावरील महेश सोसायटी चौकात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असून नागरिकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था अतिशय बिकट झालेली असून ड्रेनेज मधून घाण पाणी थेट रस्त्यावर वाहत असते याकडे प्रशासन डोळेझाक करत असल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने गटार होडी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये माजी आमदार मोहन जोशी, नितिन कदम, अभय छाजेड, बाळासाहेब ओसवाल, जयकुमार ठोंबरे, राजेंद्र पायगुड़े, सुनील बगाडे, संजय सोनिगरा, गणेश हनमघर, रफ़ीक आलमेल, द स पोलेकर, महाविकास आघाडीचे नेते सर्व कार्यकर्ते स्थानिक नागरिक उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे नेते रामविलास माहेश्वरी यांनी याचे आयोजन केले होते.















