कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे: सोबत राहण्यास नकार देणाऱ्या पत्नीवर पतीने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी इंदिरानगर गल्लीनंबर १ येथे घडली.
या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने पत्नीला सोबत राहण्यास नकार दिल्यामुळे धारदार शस्त्राने वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय पत्नीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार, राजवली हारुण मुलाणी (रा. शहाजीनगर, बावडा, ता. इंदापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गेल्या एक वर्षापासून पतीपासून वेगळ्या राहत होत्या. तपास पोलीस उप निरीक्षक रवींद्र गावडे करीत आहेत.

















