हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअरमधून गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवण्याचे आमिष दाखवून हडपसरमधील एकाची १३ लाखांची फसवणूक झाली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी तरुणाने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधला.
शेअर्सची माहिती देऊन गुंतवणूक करून चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून फिर्यादींचा विश्वास संपादन केला.
त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांची १३,७७,०००/- रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा तपास पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे करीत आहेत.
