भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पायी चालणा-या महिलांचे मंगळसूत्र चोरी करणारा जेरबंद करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून सव्वादोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट रोजी दुपारी २४ वाजता खेडेकर चाळ, महादेव मंदिरासमोरील लेन, आंबेगाव पठार येथे फिर्यादी पायी चालत असताना पांढऱ्या रंगाच्या अॅक्टीव्हा दुचाकीवर असलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादी यांचे गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून चोरी केले.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेणेबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या. त्यानुसार पथकाचे अधिकारी व अंमलदार मितेश चोरमाले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, अवधुत जमदाडे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे पांढऱ्या रंगाच्या अॅक्टीव्हा दुचाकीवर एक संशयीत इसम दिसून आला.
त्या संशयीत इसमाचा शोध घेत असताना पोलिसांनी समर्थ राजू कोंथीबिरे (वय २६ वर्षे, रा. निवृत्तीनगर, वडगाव बु., पुणे; मुळ सोलापूर) यास ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी गाडीवर लेकटाऊन भागात दिसून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे तपास करून त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नमुद गुन्ह्यात अटक केली आहे.
अटके दरम्यान आरोपीकडे तपास करता त्याने आणखी सोन्याचा लक्ष्मीहार व दुचाकी गाडी चोरी केल्याचे कबूल केले असून त्याचेकडून २,२५,०००/- रुपयांच्या किंमतीचे ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व हार जप्त केले आहेत. तसेच दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. आरोपीकडून एकूण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमाले, अवधुत जमदाडे, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, महेश बारवकर, चेतन गोरे, निलेश जमदाडे, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, सतिश मोरे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, विनोद कांबळे यांच्या पथकाने केली आहे.
