महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित सेठ श्री पन्नालाल लुणकरण लुंकड वसतिगृहातील विद्यार्थी व सौ.ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व श्री गुरु गणेश विद्यामंदिर येथील विद्यार्थिनींचा एकत्रित रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल, कार्यकारणी सदस्य दिनाताई प्रकाश धारिवाल, उपाध्यक्ष झुंबरलाल चोपडा, कार्याध्यक्ष शांतीलाल लुंकड, ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲड. राजेंद्रकुमार मुथा, कोषाध्यक्ष प्रकाश चोपडा, सहाय्यक सेक्रेटरी अनिलकुमार कांकरिया, सहाय्यक सेक्रेटरी राजेशकुमार सांकला यांनी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास कार्यकारणी सदस्य प्रकाश बंब , विनय बंबोरीया , मंगला बंबोरिया, कांतीलाल बबोरिया, चंद्रकांत भन्साळी, हर्षद कदम ,कार्यकारणी सदस्य सुमतीलाल ओस्तवाल, डॉ.वैभव शहा, सायली शहा , महावीर जैन , सतीश भारती तसेच सर्व विभागांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर प्रशालेच्या प्राचार्या सारंगा भारती यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थिनींनी नवकार महामंत्र , स्वागत गीत, राखी गीत, नाटिका,मनोगत सादर केले. मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये रक्षाबंधन व आपल्या संस्कृतीचे महत्त्व सांगितले.
वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींनी राखी बांधून रक्षाबंधनचा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती नेवाळे यांनी केले व महावीर जैन यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आभार सुमतीलाल ओस्तवाल यांनी मानले.