आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शी बाजार समितीसाठी विजय राऊतांसह तिघे अशासकीय सदस्य

Spread the love

बार्शी : राज्याच्या पणन मंत्रालयाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शीचा कारभार पाहण्यासाठी अशासकीय समितीची नेमणूक केली आहे.

अशासकीय समितीच्या अध्यक्षपदी (मुख्य प्रशासक) विजय राऊत (नाना) यांची तर प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच या समितीत शाहूराजे संतोष निंबाळकर व ओंकार नानासाहेब धायगुडे यांचीही सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

निवड होताच मुख्य प्रशासक व प्रशासक यांनी आपला पदभार स्वीकारला. पदभार घेतल्यानंतर बाजार समितीच्या मुख्य कार्यालयामध्ये आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते विजय राऊत आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती रणवीर राऊत, सचिव तुकाराम जगदाळे, कर्मचारी, बाजार आवारातील सर्व आडते व्यापारी, हमाल, तोलार, चाळणी कामगार व शेतकरी बांधव उपस्थित होते.