लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भरधाव डंपरच्या धडकेने दोन जण ठार झाल्याची घटना थेऊर गावाच्या हद्दीत गणेशवाडी येथील एच पी पेट्रोल पंपाजवळ (ता. हवेली, जि. पुणे) घडली आहे.
हा अपघात १ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत पवार (वय ३१ वर्षे, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
या अपघातात अभिजीत सुरेश पवार (वय ३६ वर्षे) आणि फिर्यादी यांचे वडील सुरेश प्रभाकर पवार (वय ६२ वर्षे, रा. बकोरी फाटा, वाघोली, पुणे) हे ठार झाले आहेत. अपघाताची खबर न देता चालक पळून गेला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करत आहेत.















