लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लोणीकाळभोर येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात यश आले आहे. त्यांच्या कडून ३८ किलो ८७० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत अमली पदार्थांशी संबंधित पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन इसम शेल पेट्रोलपंप रोड, लोणी काळभोर, पुणे येथे सार्वजनिक ठिकाणी गांजा या अंमली पदार्थाची विक्री करीत आहेत.
त्यानुसार, पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पंचासमक्ष कारवाई केली. या कारवाईत सुमेर सादीक तांबोळी (वय २६ वर्षे, रा. जयभवानी चौक, बुरड गल्ली, ता. सांगोला, जि. सोलापूर) आणि विकास बाळू बनसोडे (वय ३४ वर्षे, रा. भीमनगर, सांगोला, सोलापूर) यांच्या ताब्यातून ३८ किलो ८७० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
त्यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार युवराज कांबळे, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदिप जाधव, साहिल शेख, अझीम शेख, आझाद पाटील व दिनेश बास्टेवाड यांनी केली.
