महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे विभागीय शालेय बुद्धिबळ व स्केटिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार यश मिळवले. वयोगट १४ मुलींच्या गटात प्रथम क्रमांक सान्वी गोरे, वयोगट १७ मुलांच्या गटात चौथा क्रमांक प्रज्ज्वल शिंदे, व वयोगट १९ मुलांच्या गटात प्रथम क्रमांक प्रसन्न जगदाळे यांनी मिळवला. एकूण ३ खेळाडूंची विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे.
कुमठा नाका क्रीडा संकुल सोलापूर येथे १४/१७/१९ वयोगटातील मुले व मुलींच्या शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून श्री. अतुल नलगे यांनी काम पाहिले.
जिल्ह्यातील एकूण ३३० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. तसेच, शालेय जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक हर्ष बेणारे, द्वितीय क्रमांक रेणुका गायकवाड, आणि तृतीय क्रमांक लकी पायघन यांनी मिळवला. या तीन खेळाडूंची देखील विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे.
सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक पी.डी. पाटील, योगेश उपळकर, आणि विकास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी विशेष अभिनंदन केले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी. पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य श्री. ए.पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार श्री. जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व्ही.एस. पाटील, बी.के. भालके, सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक एस.सी. महामुनी, पर्यवेक्षिका एन.बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
