सहकारनगर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मोक्का आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास पकडण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १० सप्टेंबर रोजी सहकारनगर येथे ही कारवाई करण्यात आली. पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलिक यांना माहिती मिळाली की मोक्का अंतर्गत पाहिजे असलेला आरोपी राजकुमार परदेशी हा बालाजीनगर येथील रजनी कॉर्नर जवळील धनकवडे हॉस्पिटल येथे मित्राला भेटण्यासाठी थांबला आहे.
ही माहिती त्यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांना कळविली. त्यांनी त्वरित सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील व अंमलदारांची एक टीम तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी दिलेल्या ठिकाणी जाऊन छापा मारून आरोपीस ताब्यात घेतले. राजकुमार शामलाल परदेशी (वय २६ वर्षे, रा. स. नं. २३/१०, मोरे चाळ, धनकवडे हॉस्पिटल जवळ, रजनी कॉर्नर, बालाजीनगर, धनकवडी, पुणे; सध्या रा. ग्राम रामपूर, पोस्ट लालगंज, जिल्हा प्रतापगड, राज्य उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीवर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी असे एकूण ४ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी करत आहेत. सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील,
सहायक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, अमित पदमाळे, सागर कुंभार, खंडू शिंदे, विशाल वाघ, सागर सुतकर, योगेश ढोले, महेश भगत यांनी केली आहे.
