महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सुलाखे हायस्कूलने विजेतेपद मिळवले.17 वर्षेगटात मुलीच्या व 19 वर्षेगटात मुलांच्या संघाने ने विजेतेपद मिळवत विजयी समारोप केला.
युवक व क्रीडा संचलनालय व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालया मार्फत घेण्यात येणाऱ्या तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन बी पी सुलाखे कॉमर्स कॉलेज ने केले. मागील चार दिवसापासून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा शिवशक्ती मैदान बार्शी येथे पार पडल्या. यामध्ये विविध वयोगटांमध्ये स्पर्धा झाल्या.
19 वर्षे मुले व मुली, 17वर्षे मुले व मुली आणि 14 वर्षे मुले असे नियोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी मा जयकुमार शितोळे, क्रीडा संचालक प्रा दिलीप मोहिते, सुलाखे इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक तुषार महाजन, क्रीडा समन्वयक संजय पाटील, तालुका क्रीडा समन्वयक समीर वायकुळे, क्रीडा विभाग प्रमुख प्रमोद माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला तर दि. 13 सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा समारोप सोहळा प्रमुख पाहुणे प्रा डॉ. अनिल कांबळे बी पी एड विभागप्रमुख, बार्शी तालुका संयोजक संजय पाटील, शिवाजी महाविद्यालय क्रीडा विभाग प्रमुख प्रा आनंद निंबाळकर, डॉ. राम नागटिळक, डॉ. हरिदास बारस्कर, बार्शी तालुका क्रीडा समन्वयक समीर वायकुळे, सुलाखे हायस्कूल क्रीडा विभाग प्रमुख प्रमोद माळी, उमेश चव्हाण, सुहास देशमुख, अतुल जाधव, योगशिक्षिका प्रा. स्नेहा वेदपाठक, स्पर्धा संयोजन समितीचे प्रमुख दत्तप्रसाद सोनटक्के प्रा. रूपाली शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला समारोपाच्या दिवशी सतरा वर्ष मुली व 19 वर्षे मुले अशा स्पर्धा पार पडल्या.
या दोन्ही स्पर्धेमध्ये सुलाखे हायस्कूल अजिंक्य राहिले प्रथम 19 वर्षे मुले या गटांमध्ये सुलाखे हायस्कूलने अंतिम सामन्यांमध्ये एमआयटी विद्यालय बार्शीचा नऊ विकेट राखून पराभव केला. या सामन्यात शिवराज मांगडे, संस्कार देवधरे, सारंग मस्तुद, अभिनंदन नवले, यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत एमआयटी विद्यालय बार्शीला निर्धारित 8 षटकामध्ये सर्व बाद 49 धावा मध्ये रोखले.
जीशान मुल्ला, शिवराज मांगडे, सारंग मस्तुद यांनी तडाखे बंद फलंदाजी करत 3.1 षटकांमध्ये पूर्ण केले. जिशान मुल्ला दोन चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 28 धावा काढल्या. 19 वर्षे मुले विजयी संघ: सारंग मस्तुद, सोहम देशमुख, जिशान मुल्ला, शिवराज मांगडे, अभिनंदन नवले, सोहम मस्तुद, मानस फोपले, ऋतुराज पाटील, सिद्धार्थ बागल, संस्कार देवधरे, वीरेंद्र शिंदे, रोहित कदम, अनुकल्प जाधवर, सोहम मस्तुद तर 17 वर्षे मुली गटात अंतिम सामन्यात सुलाखे हायस्कूल बार्शी विरुद्ध सुलाखे इंग्लिश मीडियम स्कूल बार्शी असा झाला.
सुलाखे हायस्कूल बार्शी ने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली व निर्धारित सहा षटकांमध्ये सुलाखे इंग्लिश मीडियम स्कूल ला 29 धावात रोखले. विजयाचे लक्ष गाठत असताना सुलाखे हायस्कूलने पाच षटकांमध्ये 30 धावा करीत विजय मिळवला.
सुलाखे हायस्कूल कडून श्रावणी बगले, आर्या बगले, संस्कृती खेडकर, अनुष्का माळी, स्तुती लोखंडे यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली सृष्टी आजबे, अनुष्का माळी, किमया सोनवणे, स्वरा पाटील, अक्षरा ताकभाते, कृष्णा शर्मा यांनी सुलाखे हायस्कूल ला विजय मिळवून दिला.
2024 – 25 तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये सुलाखे हायस्कूल ने सर्व गटात विजय संपादन केला. या सर्व संघाचे कोच शिक्षक सुहास देशमुख, तालुका क्रीडा समन्वयक समीर वायकुळे क्रीडा विभाग प्रमुख प्रमोद माळी, सुहास शिंदे, संतोष पवार यांनी मार्गदर्शन केले.
सर्व विजयी संघांचे बार्शी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंद सुलाखे, सचिव अनंत कवठाळे, सुलाखे हायस्कूलचे मुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर, उपमुख्याध्यापक रामकृष्ण इंगळे पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. सुलाखे हायस्कूल चे चारही संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
