चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पायी जाणाऱ्या वृद्धेचे मंगळसूत्र पळवल्याची घटना बालेवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवनेरी पार्क लेन, गणराज अपार्टमेंट समोर, बालेवाडी, पुणे येथे फिर्यादी, ६५ वर्षांच्या महिला, पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या इसमांनी त्यांच्या गळ्यातील ८०,०००/- रु किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरी करून पळवले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.
