कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : फ्लॅट फोडून अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी करण्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. गणेश चव्हाण (वय ४९ वर्षे, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली असून, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ सप्टेंबर रोजी गल्ली नं १३, सर्व्हे नं ६०/१/ब, साईनगर, साई पार्क बिल्डिंग, फ्लॅट नं १०१ आणि १०२ कोणी तरी फोडला. घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी सहाय्याने उचकटून, त्यामार्गे आत प्रवेश करून, बेडरूममधील कपाटातील २,६८,०००/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून नेले आहेत.

















