कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पौड रोडवर भरधाव दुचाकीने वृद्धाला चिरडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास घडली आहे. सुश्रुत हॉस्पिटल जवळ, पौड रोडवर, एका दुचाकीस्वाराने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वेगाने चालवत फिर्यादींचे वडील, बाळासाहेब लक्ष्मण तनपुरे (वय ६५ वर्षे, रा. स. नं. ४६/३, फ्लॅट नं. १, लक्ष्मण व्हिला अपार्टमेंट, सुश्रुत हॉस्पिटलच्या बाजूला, पौड रोड, कोथरूड) यांना धडक दिली.
रस्ता ओलांडत असताना त्यांना जोरदार ठोकर मारून गंभीर जखमी केले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या ठिकाणी न थांबता, अपघाताची खबर न देता चालक पळून गेला. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. आर. आडगळे करीत आहेत.
